रत्नागिरी (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत रत्नागिरी पोलिसांनी 'अमली पदार्थमुक्त रत्नागिरी दौड'चे आयोजन केले होते. यामध्ये पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि २०० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
ही दौड पोलीस मुख्यालयापासून सुरू होऊन भाट्ये समुद्रकिनाऱ्यापर्यंत गेली आणि परत पोलीस मुख्यालयात समाप्त झाली. भाट्ये किनाऱ्यावर पोलिसांनी स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक कचरा गोळा केला. या उपक्रमात लायन्स क्लब आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सदस्यांनीही सहभाग घेतला.
यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर राहून 'फिट इंडिया' चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत रत्नागिरी पोलिसांनी काल दुचाकींवरून तिरंगा यात्राही काढली होती, ज्यात ७० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
Ratnagiri Police, Har Ghar Tiranga, Run, Anti-Drug Campaign, Fit India, Cleanliness Drive
#RatnagiriPolice #HarGharTiranga #DrugFreeRatnagiri #FitIndia #Ratnagiri #CleanlinessDrive #MaharashtraPolice
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: