या प्रकरणानुसार प्रियंकानगरी, वाघोली येथे ३१ जुलै २०२५ रोजी रात्री २ वाजता कृष्णा मेटल्स या दुकानाचे शटर तीन अनोळखी व्यक्तींनी उचकटून चोरी केली होती. या घटनेनंतर फिर्यादीने तक्रार दिल्यावर गुन्हा क्रमांक ३८०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(४), ३२४(४), ३(५) प्रमाणे दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या गुप्त माहितीच्या आधारे तपासात असे निष्कर्ष निघाले की आरोपींनी हडपसर भागातून रिक्षा चालवून आले होते आणि त्यांनी भांड्याच्या दुकानात चोरी केली होती. यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पहिला आरोपी अनिकेत अविनाश इंगळे वय २१ वर्षे, रा. बिरादारनगर, नर्मदाबाई कांबळे शाळेजवळ, वेदुवाडी, हडपसर, पुणे आणि दुसरा आरोपी साहिल रोशन शेख वय २० वर्षे, रा. बिरादारनगर, नर्मदाबाई कांबळे शाळेजवळ, वेदुवाडी, हडपसर, पुणे असे आहेत.तसेच एका अल्पवयीनालाही ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हडपसर भागातून रिक्षा चालवून आणून वाघोली येथील भांड्याच्या दुकानात चोरी केल्याचे कबूल केले. त्यामुळे आरोपी १ ते २ यांना अटक करून त्यांच्याकडून एकूण ५९,०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Crime News, Shop Theft, Police Investigation, Wagholi Police Station, Utensils Shop Burglary, Property Recovery
#WagholiPolice #ShopTheft #PunePolice #CrimeNews #UtensilsShop #PoliceInvestigation #PropertyRecovery #HadapsarCrime #MaharashtraPolice #KrishnaMetals

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: