पुणे, (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या मुंढवा स्टेशनने एका तरुणाला पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह अटक करण्यात मोठी कामगिरी बजावली आहे. आरोपी राहुल संजय देटके (वय २३, रा. म्हसोबा वस्ती, मांजरी बुद्रुक, पुणे) याला हडपसर रेल्वे स्टेशनजवळील किर्तनेबाग परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांना ३१
जुलै २०२५ रोजी
खबर मिळाली होती
की, एक तरुण
हडपसर रेल्वे स्टेशनजवळ पिस्तूल आणि
जिवंत काडतुस घेऊन
उभा आहे. या माहितीच्या आधारे,
तपास पथकाने तात्काळ सापळा
रचून आरोपीला जागीच
ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये एक
पिस्तूल आणि एक जिवंत
काडतुस सापडले.
याप्रकरणी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी राहुल देटके याच्याविरोधात शस्त्र अधिनियम ३ (२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात संभाव्य धोका टळला असून पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
Law Enforcement, Crime News,
Pune Police
#PunePolice #MundhwaPolice #CrimeNews #PistolArrest #PuneCity #LawAndOrder #Hadapsar #ArmsAct

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: