पुणे: खून, मोका (MCOCA) आणि बलात्काराच्या गुन्ह्यांमधील मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या विशाल लक्ष्मण भोले (वय ३२, रा. दुष्काळ झोपडपट्टी, ताडीवाला रोड, पुणे) याला बंडगार्डन पोलिसांनी अखेर अटक केली आहे. आरोपीने एका महिलेसोबत लग्न करण्याचे खोटे आश्वासन देऊन तिच्या इच्छेविरुद्ध अनेक वेळा जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले होते.
फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी विशाल भोलेचे लग्न झालेले असतानाही, त्याने ते लपवून महिलेसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. या बहाण्याने त्याने महिलेसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. जेव्हा महिलेने लग्नाबाबत विचारले, तेव्हा त्याने तिला मारहाण, शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिवाय, आरोपी विशाल भोले याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुन आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (MCOCA) गुन्हा दाखल होता. गुन्हा घडल्यापासून तो फरार होता. अखेर, पोलीस उप आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
Fugitive Arrest, Murder, Rape, MCOCA, Bundgarden Police
#Pune #FugitiveArrest #MCOCA #RapeCase #PoliceArrest

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: