नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा
विदर्भात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित
मुंबई : मध्य भारतावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या १८ आणि १९ ऑगस्ट रोजी कोकण, मुंबई महानगर प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे.
या अंदाजानुसार, कोकणातील सर्व जिल्हे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई महानगर प्रदेशाचा उर्वरित भाग, तसेच सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांच्या काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामुळे काही ठिकाणी दरड कोसळणे आणि सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. खान्देश आणि मराठवाड्याच्या उर्वरित भागात मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित असून, तुलनेने विदर्भात मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
Maharashtra
Rainfall Forecast
Monsoon
Konkan
Western Maharashtra
Mumbai
#MaharashtraRains #Monsoon2025 #WeatherForecast #Konkan #Mumbai #Pune #FloodWarning
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: