पुणे
पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी
पथक ०२ आणि
युनिट ०६, गुन्हे
शाखा यांनी दिनांक
१५/०८/२०२५
रोजी वाघोली भागात
छापा टाकून मोठी
कारवाई केली आहे.
या
मोहिमेअंतर्गत, पुणे पोलिसांनी
₹७६,०१,७१०/-
रुपये किमतीचे मॅफेड्रॉन
(एम.डी.) अंमली
पदार्थ जप्त केले
आहेत.
तांबे
वस्ती, गुलमोहर पार्क, बकोरी,
वाघोली येथे सार्वजनिक
ठिकाणी केलेल्या या कारवाईत
दोन आरोपींना अटक
करण्यात आली आहे.
आरोपींची
नावे रामेश्वरलाल मोतीजी
आहिर (वय ४५)
आणि नक्षत्र हेमराज
अहिर (वय २५)
अशी असून, ते
दोघेही राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील चक्रतीय
गावातील रहिवासी आहेत.
त्यांच्या
ताब्यातून ३५१ ग्रॅम
५०२ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन
(एम.डी.) तसेच
इतर साहित्य जप्त
करण्यात आले आहे.
याप्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये
एन.डी.पी.एस. ॲक्ट
कलम ८ (क),
२१ (क), २९
अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
ही
कारवाई अपर
आयुक्त पंकज
देशमुख,
उपआयुक्त निखील
पिंगळे आणि सहा. आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या
मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक सुदर्शन
गायकवाड , वाहीद
पठाण,
सहा. निरीक्षक नितीनकुमार नाईक, राकेश
कदम, मदन
कांबळे आणि
इतर अंमलदारांनी
या कारवाईत भाग
घेतला.
·
Crime
·
Pune Police
·
Drug Bust
·
Law Enforcement
·
Narcotics
#PunePolice #DrugBust #Mephedrone #CrimeBranch #Wagholi #Pune
#AntiNarcotics #NDPSAct
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: