१२ ऑगस्ट २०२५ रोजी वाघोली पोलीस स्टेशनचे तपास पथक गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना, त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, डोमखेल रोड, आव्हाळवाडी येथे एक संशयित व्यक्ती पिस्तूल घेऊन थांबलेला आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्या ठिकाणी वर्णनानुसार एक व्यक्ती दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून नाव विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल आणि खिशात एक जिवंत काडतूस आढळून आले.
या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, (२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे आणि सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक युवराज हांडे यांच्या पथकाने केली आहे.
Crime, Wagholi Police Station, Pune, Illegal Weapon, Arrest
#Pune #Wagholi #Crime #IllegalWeapon #Police #Arrest #PunePolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: