पिंपरी-चिंचवड, (प्रतिनिधी): आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य व पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात \पार पडला. हा सोहळा केवळ परंपरेपुरता मर्यादित न राहता, परंपरेचा वारसा, सांस्कृतिक जपणूक आणि शैक्षणिक संदेश देणारा उपक्रम ठरला.
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने साजरा करण्यात आला.
या सोहळ्याला सामाजिक व शैक्षणिक अधिष्ठान देत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरणाचा कार्यक्रमही घेण्यात आला.रसिका गायगोले हिला 'सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप' तर सुरज सोमुसे आणि सुजल जौजाळकर यांना 'महात्मा जोतिबा फुले स्कॉलरशिप' प्रदान करण्यात आली. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात आला होता.
या कार्यक्रमाला 'आप'चे कार्याध्यक्ष अजित फाटके, राष्ट्रीय उपाध्यक्ष सिद्धेश भगत, महाराष्ट्र राज्य समन्वयक अमित म्हस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दहीहंडी सोहळ्याचे आयोजन 'आप'चे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
Aam Aadmi Party
Dahi Handi
Pimpri Chinchwad
Arvind Kejriwal
Scholarship Distribution
#AamAadmiParty #DahiHandi #PimpriChinchwad #ArvindKejriwal #Scholarship #SocialWork

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: