राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या वतीने परिसंवादाचे आयोजन
पुणे, (प्रतिनिधी): आजच्या युवा पिढीला 'अर्बन' नक्षलवादाच्या प्रचाराला बळी पडू द्यायचे नसेल, तर त्यांनाही या संकटाची माहिती करून द्यायला हवी, या उद्देशाने राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या वतीने पुणे येथे 'वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा!' या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
वार - मंगळवार
दिनांक - १९ ऑगस्ट २०२५ वेळ : सायं. ६
स्थळ : टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे.
या परिसंवादात प्रसिद्ध लेखक अभिजित जोग, ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते माधव भांडारी, साहाय्यक पोलीस आयुक्त (नि.) भानुप्रताप बर्गे, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते विक्रम भावे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी किंवा सहभागी होण्यासाठी ८९८३३५५१७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Urban Naxalism
Pune Seminar
Rashtrabhakta Adhivakta Samiti
Public Security Act
Abhijit Jog
#UrbanNaxalism #Pune #Seminar #PublicSafety #RashtrabhaktaAdhivaktaSamiti

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: