वायरलेस मायक्रोफोन 'ULTMIC1' सह कराओकेचा अनुभव आणखी आनंददायी
नवी दिल्ली, (प्रतिनिधी): सोनी इंडियाने आज 'ULT POWER SOUND' सीरिजमधील अधिक ऍडव्हान्स्ड लाइनअपचे उद्घाटन केले. या नवीन उत्पादनांमध्ये शक्तिशाली वायरलेस पार्टी स्पीकर्स, कॉम्पॅक्ट ब्लूटूथ स्पीकर्स आणि एक वायरलेस ड्युअल माइक यांचा समावेश आहे. यामुळे पार्टीचा आणि संगीताचा अनुभव आणखी वाढणार आहे.
सोनी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील नय्यर यांनी सांगितले की, "आमच्या ग्राहकांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ULT POWER SOUND सीरिज शक्तिशाली बास इफेक्ट आणि इमर्सिव्ह ध्वनी देते." यावेळी त्यांनी गायक करण औजला यांना ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून जाहीर केले.
नवीन उत्पादनांची माहिती:
ULT TOWER 9 आणि ULT TOWER 9AC: हे वायरलेस पार्टी स्पीकर्स 360° पार्टी साउंड आणि 360° पार्टी लाईट देतात. यात 25 तासांपर्यंत बॅटरी लाइफ आणि जलद चार्जिंगची सुविधा आहे.
ULT FIELD 5 आणि ULT FIELD 3: हे कॉम्पॅक्ट ब्लूटूथ स्पीकर्स वॉटरप्रूफ, डस्टप्रूफ आणि शॉकप्रूफ असून प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. ULT FIELD 5 मध्ये 25 तासांचे बॅटरी लाइफ, तर ULT FIELD 3 मध्ये 24 तासांपर्यंत बॅटरी लाइफ मिळते.
ULTMIC1: हा वायरलेस ड्युअल माइक कराओके नाईट्ससाठी उपयुक्त आहे. डुएट असिस्ट फीचरमुळे दोन आवाजांमध्ये संतुलन राखले जाते. यात 20 तासांपर्यंत प्ले-टाइम आणि फास्ट चार्जिंगची सुविधा आहे.
नवीन ULT POWER SOUND उत्पादने (ULT TOWER 9, ULT TOWER 9AC, ULT FIELD 5, ULT FIELD 3 आणि ULTMIC1) सर्व सोनी स्टोअर्स आणि प्रमुख ई-कॉमर्स पोर्टल्सवर उपलब्ध आहेत. ULT TOWER 9 आणि ULT TOWER 9AC च्या खरेदीवर ग्राहकांना १९,९९० रुपये किमतीचा सोनी वायरलेस माइक मोफत मिळेल.
Sony India
ULT POWER SOUND
New Products
Wireless Speakers
Karan Aujla
#SonyIndia #ULTPowersound #KaranAujla #NewSpeakers #BluetoothSpeaker #WirelessMic

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: