डॉ. बाफना हे हस्तसामुद्रिक, ऑरा रीडिंग, रेकी हीलिंगचे प्रख्यात अभ्यासक
पुणे, (प्रतिनिधी): भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आयोजित ४३ व्या दोन दिवसीय अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात ज्येष्ठ ज्योतिषी डॉ. विलास बाफना यांचा ज्योतिष क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. 'ग्रहांकित' मासिकाचे संपादक चंद्रकांत शेवाळे आणि सौ. पुष्पलता शेवाळे यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम २२ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडला.
डॉ. विलास बाफना हे गेल्या ६० वर्षांपासून हस्तसामुद्रिक ज्योतिष क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनात जलसंपदा उभारणी क्षेत्रातही योगदान दिले आहे. त्यांनी 'रेकी हीलिंग'वर अनेक चर्चासत्रे घेऊन विस्तृत लेखन केले आहे. तसेच, त्यांनी हजारो व्यक्तींना हस्तसामुद्रिक, ऑरा रीडिंग, डाऊझिंग, रेकी हीलिंग यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे झालेल्या या अधिवेशनात देशभरातील अनेक नामवंत ज्योतिर्विद सहभागी झाले होते. सत्काराच्या वेळी रजनी साबडे, उल्हास पाटकर, नवीनभाई शहा, जयश्री बेलसरे हे मान्यवर उपस्थित होते.
Astrology
Vilas Bafna
Pune
Felicitation
Palmistry
#Astrology #VilasBafna #Pune #Jyotish #Palmistry

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: