पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्कराच्या तिन्ही दलांचे अभिनंदन
पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या कारवाईवर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही कारवाई प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैनिकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेअंतर्गत आज केलेली कारवाई प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले. या हल्ल्यात ज्या अभागी महिलांना आपल्या पतीला गमवावे लागले, त्याचा बदला भारतीय जवानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे सडेतोड प्रत्युत्तर देत घेतला आहे. चिमूटभर सिंदूरची किंमत काय असते, याची जाणीव भ्याड पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना झाली असेल. देशभरातील प्रत्येक महिला भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.”
त्यांनी पुढे म्हटले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि लष्कराच्या तिन्ही दलांचे मी अभिनंदन करते.”
......................................

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: