पाकिस्तानी अतिरेक्यांवरील कारवाई: हिंदू समाजाच्या अस्मितेचा निर्णायक प्रतिशोध! - सनातन संस्था

 


मुंबई : "भारतीय सैन्यदलाने काल रात्री पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर अत्यंत अचूक आणि निर्णायक एअर स्ट्राइक करून ती सर्व तळे उद्ध्वस्त केली आहेत. ही केवळ एक सैनिकी कारवाई नव्हे, तर देशाच्या अस्मितेचा, सुरक्षिततेचा आणि आत्मगौरवाचा बुलंद शंखनाद आहे," असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री अभय वर्तक यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे २६ निरपराध हिंदू पर्यटकांची जी निर्घृण हत्या करण्यात आली, तो हल्ला केवळ काही व्यक्तींवर नव्हता. तो हल्ला संपूर्ण हिंदू समाजावर होता, भारताच्या संस्कृतीवर होता. या क्रौर्याचा जो बदला भारतीय सैन्याने घेतला आहे, तो प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतीयाच्या हृदयाला समाधान देणारा आहे.

सनातन संस्थेच्या वतीने या निर्णायक कारवाईचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो. हे केवळ सूड नव्हे, ही हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आणि भारताच्या अखंडतेसाठी घेतलेली धाडसी पावले आहेत.

भारतातील हिंदू आता जागा झालेला आहे. त्यामुळे त्याच्या मागणीची दखल घेऊन सरकारनेही चोख प्रतिउत्तर पाकिस्तानला दिले आहे. आता जर पाकिस्तानने वेगळी आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना यापेक्षा अधिक कठोर उत्तर मिळेल, हे भारतीय लष्कर आजच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

"'सनातन राष्ट्र शंखनाद' ही केवळ घोषणा नाही. ती हिंदू समाजावरील अन्याविरुद्धचा हिंदूंच्या एकजुटीचा हुंकार आहे. संपूर्ण हिंदू समाज हा भारतीय सैन्याबरोबर एकजुटीने उभा आहे," असेही श्री. वर्तक यांनी नमूद केले.

.....................................

#OperationSindoor

#SanatanSanstha

#IndianArmy

#HinduPride

#PahalgamAttack

#IndiaStrikesBack

#NationalSecurity

पाकिस्तानी अतिरेक्यांवरील कारवाई: हिंदू समाजाच्या अस्मितेचा निर्णायक प्रतिशोध! - सनातन संस्था पाकिस्तानी अतिरेक्यांवरील कारवाई: हिंदू समाजाच्या अस्मितेचा निर्णायक प्रतिशोध! - सनातन संस्था Reviewed by ANN news network on ५/०८/२०२५ ०२:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".