आमदार हेमंत रासने यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाकडून विशेष दखल
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आता प्रमुख शासकीय विभागांचे अधिकारी थेट रस्त्यावर उतरणार आहेत. आमदार हेमंत रासने यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पुणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) चे उच्चपदस्थ अधिकारी उद्या (गुरुवार, ८ मे २०२५) संपूर्ण मतदारसंघात पाहणी दौरा करणार आहेत.
या पाहणी दौऱ्यात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानदेव तरंगे यांच्यासह पोलीस वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.
हा पाहणी दौरा उद्या सकाळी ७:०० वाजता पीएमसी कॉलनी, राजेंद्र नगर, पुणे येथून सुरू होणार आहे. या दौऱ्यादरम्यान अधिकारी नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेणार आहेत आणि जागेवरच शक्य असलेल्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.
आमदार हेमंत रासने यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या अनेक समस्यांबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आता प्रशासनातील प्रमुख अधिकारी एकत्रितपणे नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी येत आहेत.
या उपक्रमाबद्दल बोलताना कसबा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष अमित कंक, छगन बुलाखे आणि प्रशांत सुर्वे यांनी सांगितले की, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून पाहणी करणे हे निश्चितच स्वागतार्ह पाऊल आहे. या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मार्गी लागतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
- ----------------------------------
- #KasbaProblems
- #CitizenIssues
- #PMCPune
- #PunePolice
- #Mahavitaran
- #InspectionDrive
- #HemantRasane

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: