प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी आनंद मुळुक

 


प्राधिकरण, निगडी : प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या २०२५-२०२६ या वर्षाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये हास्यरंग कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ नागरिक आनंद मुळुक यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.

या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून श्रीमती अलका बेल्हेकर, कार्याध्यक्ष म्हणून दिलीप गोसावी, सहकार्याध्यक्ष म्हणून दिनेश जैन, कोषाध्यक्ष म्हणून विलास बेल्हेकर आणि सहकोषाध्यक्ष म्हणून श्रीनिवास ठोंबरे यांची निवड झाली आहे. संघाच्या संपादकपदी  अशोक चोपडे आणि सहसंपादकपदी श्रीमती आशा नष्टे यांची निवड झाली आहे.

याव्यतिरिक्त, विविध समित्यांच्या प्रमुखांची निवडही करण्यात आली आहे. श्रीमती शुभदा मेंगळे यांची सर्व समिती प्रमुख म्हणून निवड झाली आहे. कार्यक्रम व्यवस्थापन प्रमुख म्हणून  शरद यन्नुवार आणि सहप्रमुख म्हणून सुभाष बोरोले काम पाहणार आहेत. जनसंपर्क अधिकारी म्हणून अशोक वीरकर, शिक्षण, क्रीडा व सहल प्रमुख म्हणून श्रीमती कुंदा कोळपकर आणि सहप्रमुख म्हणून   मकरंद बडवे यांची निवड झाली आहे. सांस्कृतिक प्रमुख म्हणून श्रीमती रजनी जैन आणि सहप्रमुख म्हणून श्रीमती सुनंदा कुंभार, पत्र लेखन प्रमुख म्हणून वसंत पाटील आणि सहप्रमुख म्हणून श्रीमती अलका करंदीकर, तर सार्वजनिक समस्या निवारण विभागाचे प्रमुख म्हणून  काशिनाथ पाटील यांची निवड झाली आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष  मुळुक हे चासकमान येथील रहिवासी असून, त्यांनी चिंचवड येथील ग्रीव्हज कौटन कंपनीच्या डिझेल इंजिन विभागात ३८ वर्षे सेवा केली. ते १ मार्च २०१२ रोजी वयाच्या साठाव्या वर्षी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ‘हास्यरंग’ या त्यांच्या विनोदी एकपात्री कार्यक्रमाचे अनेक ज्येष्ठ नागरिक संघ, शाळा, कोजागिरी पौर्णिमा आणि वृद्धाश्रमांमध्ये सादरीकरण केले आहे. २०२२ मध्ये त्यांना आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच, कागदाचा वापर कमी करून पर्यावरण संरक्षणासाठी मदत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

..................................

  • #SeniorCitizenAssociation
  • #AnandraoMuluk
  • #Haasyarang
  • #Pradhikaran
  • #Nigdi
  • #PuneNews
  • #SocialWork
  • प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी आनंद मुळुक प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी आनंद मुळुक Reviewed by ANN news network on ५/०७/२०२५ ०८:४७:०० PM Rating: 5

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    Blogger द्वारे प्रायोजित.
    Do you have any doubts? chat with us on WhatsApp
    Hello, How can I help you? ...
    Click me to start the chat...
    ".