– मुलांसाठी खास पॉप-अप अनुभव, पुणेकरांसाठी मे अखेरपर्यंत उपलब्ध
पुणे, १५ एप्रिल २०२५ : पुण्याच्या लोकप्रिय आणि उच्चभ्रू जीवनशैलीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपा मॉलमध्ये मुलांसाठी एक खास उन्हाळी अनुभव सुरु झाला आहे – ‘आईस्क्रीम लॅन्ड’! ११ एप्रिलपासून सुरु झालेल्या या अनोख्या पॉप-अप अनुभवाने, लहानग्यांना उन्हाळ्याच्या तप्ततेपासून गारवा देणारा आणि कल्पनाशक्तीला गुदगुदवणारा एक अद्वितीय आनंद दिला आहे.
‘Gelato’ ब्रँडसोबतच्या विशेष भागीदारीने हे आयोजन केलं असून, कोपा मॉलचं संपूर्ण रूपच एक थंडीचा अद्भुत अनुभव देणाऱ्या रंगीत, एअर कंडिशन विश्वात रूपांतरित झालं आहे. येथे मुलांना खेळ, शिक्षण आणि थंडाई यांचा एकत्रित आनंद मिळतो आहे.
मुख्य आकर्षणं:
-
Pick Your Flavour – मुलांना आवडता आईस्क्रीम फ्लेवर स्वतः निवडण्याची मजा.
-
The Frozen Lab – खेळ आणि विज्ञान यांचा अनोखा संगम.
-
Fun Facts Corner – आईस्क्रीमसंदर्भातील मजेशीर माहिती.
-
Confetti Coupon Machine – आश्चर्यकारक बक्षिसे जिंकण्याची संधी.
-
Spin the Wheel – फिरवा आणि मिळवा धमाल इनामं!
-
Sprinkle Pool – रंगीबेरंगी साखरेच्या कणांनी भरलेला खेळाचा पूल.
-
Mini Golf – Put Put Sundae – मिनी गोल्फमध्ये गोडसर ट्विस्ट!
मुलांना याशिवाय Inside Scoop Wall वर गमतीशीर तथ्ये वाचता येतात, थीमबेस्ड फोटो बूथमध्ये सेल्फी क्लिक करता येतात, आणि Ring for Ice Cream स्टेशनवर बेल वाजवून अचानक मिळणाऱ्या ट्रीट्सचा आनंद घेता येतो. DIY स्टेशनवर मुलं स्वतःच्या वॉफलवर रंगीत टॉपिंग लावून आपला आईस्क्रीम अनुभव अजून खास बनवू शकतात.
‘आईस्क्रीम लॅन्ड’ हा अनुभव म्हणजे केवळ करमणूक नाही, तर लहान मुलांना शिकण्याची, सर्जनशीलतेने खेळण्याची आणि गारवा अनुभवण्याची संधी आहे. सर्व पालकांसाठी हे एक सुरक्षित, आनंददायक आणि संस्मरणीय ठिकाण आहे.
📍 स्थान: कोपा मॉल, पुणे
📅 कालावधी: सुरु असून, मे अखेरपर्यंत चालू राहणार
🕙 वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ७
..............................
#IceCreamLand
#KopaMall
#PuneEvents
#SummerForKids
#PuneWithKids
#FrozenFun
#GelatoIndia
#FamilyFun
#KidsActivities
#SummerEscape
#PopUpEvent
#PuneLifestyle
#ThingsToDoInPune
#InteractiveLearning
#CreativeKids

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: