एसबीआय जनरल इन्शुरन्सने लाँच केला कस्टमायझेबल गृह विमा - फ्लेक्सी होम इन्शुरन्स

 

सर्वसमावेशक आणि लवचिक गृह विमा योजना देणार विविध निवासी प्रकारच्या मालमत्तांसाठी संरक्षण

मुंबई  - भारतातील जनरल विमा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने 'एसबीआय जनरल फ्लेक्सी होम इन्शुरन्स' नावाचे नवे उत्पादन बाजारात आणले आहे. ही सर्वसमावेशक आणि लवचिक विमा योजना असून यामार्फत भाडेशुल्कावरील मालमत्ता तसेच हाउसिंग सोसायटीजसारख्या विविध निवासी प्रकारच्या गरजा पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

एसबीआय जनरल फ्लेक्सी होम इन्शुरन्स ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार स्वतःची गृह विमा योजना डिझाइन करण्याची मुभा देते. या उत्पादनाचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे ते ग्राहकांना स्वतंत्र 'अग्नी' विमा कवच अनिवार्य म्हणून देते, जे प्रत्येक घरमालकासाठी वैयक्तिक संरक्षणाची हमी देते. या विम्यामध्ये मौल्यवान वस्तूंसाठी संरक्षण, राहाण्याच्या पर्यायी जागेचा खर्च, चोरीसाठी सुरक्षा कवच तसेच विविध पर्यायी कवचांवर सवलतींचा समावेश आहे.

विम्याचे संरक्षणात्मक पैलू

हे उत्पादन घराचे बांधकाम, त्यातील वस्तू आणि अतिरिक्त जोखमींवर सर्वसमावेशक संरक्षण देते. ही योजना मालमत्तेचे नुकसान, नैसर्गिक संकटे, आग आणि चोरी अशा संकटांमुळे होणाऱ्या हानीपासून सुरक्षितता प्रदान करते. त्यामध्ये अनपेक्षित घटनांचाही समावेश असल्यामुळे सुरक्षितता हवी असलेल्या घरमालक व भाडेकरूंना विश्वासार्ह पर्याय मिळतो.

विम्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे २० वर्षांपर्यंत वन-टाइम पेमेंट करून दीर्घकालीन सुरक्षा मिळू शकते.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये

  • अग्नी कवच: एकमेव अनिवार्य कवच
  • घराचे बांधकाम, त्यातील वस्तू आणि अतिरिक्त जोखमींसाठी सर्वसमावेशक संरक्षण
  • पर्यायी संकटे/कवच – नैसर्गिक संकटे, चोरी आणि दरोड्यापासून संरक्षण
  • दीर्घकालीन सुरक्षा – २० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी वन-टाइम पेमेंट
  • आकर्षक पर्यायी कव्हर्स आणि सवलतींचे पर्याय उपलब्ध

कंपनीचा दृष्टिकोन


श्री. सुब्रमण्यम ब्रह्माजोस्युला, प्रमुख, उत्पादन आणि मार्केटिंग अधिकारी, एसबीआय जनरल इन्शुरन्स म्हणाले, "प्रत्येक घर वेगळं असतं आणि म्हणून त्याच्या संरक्षणाच्या गरजाही वेगळ्या असतात याची एसबीआय जनरल इन्शुरन्सला जाणीव आहे. घरमालकाला आपल्या आयुष्याभराची गुंतवणूक असलेलं घर सुरक्षित ठेवायचं असो किंवा भाडेकरूला मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवायच्या असो, प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगवेगळ्या असतात. 'एसबीआय जनरल फ्लेक्सी होम इन्शुरन्स' या योजनेद्वारे आम्ही गरजेनुसार सुविधा देतो आणि ग्राहकाला लवचिक व विस्तारित कव्हरेजसह मनःशांती मिळते. हे उत्पादन ग्राहकांना त्यांच्या संरक्षणाच्या गरजा निवडण्याची आणि अनपेक्षित परिस्थितीमध्ये आर्थिक सुरक्षा जपण्याची मुभा देत सक्षम करते."

एसबीआय जनरल फ्लेक्सी होम इन्शुरन्स वैविध्यपूर्ण आणि ग्राहक केंद्रित गृह विमा योजना असून ते विविध घरमालक आणि भाडेकरूंच्या गरजा पूर्ण करते. वन-टाइम प्रीमियम पेमेंटचा पर्याय आणि सफाईदार क्लेम प्रक्रिया यांच्या मदतीने ही विमा योजना विकसित करण्यात आली असून ती नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक विमा सुविधा प्रदान करते.

.......................

#SBIGeneralInsurance 

#FlexiHomeInsurance 

#HomeInsurance 

#CustomizableInsurance 

#PropertyProtection 

#FinancialSecurity 

#InsurancePlans 

#LongTermCoverage 

#FireProtection


एसबीआय जनरल इन्शुरन्सने लाँच केला कस्टमायझेबल गृह विमा - फ्लेक्सी होम इन्शुरन्स एसबीआय जनरल इन्शुरन्सने लाँच केला कस्टमायझेबल गृह विमा - फ्लेक्सी होम इन्शुरन्स Reviewed by ANN news network on ५/०६/२०२५ ०६:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".