पिंपरी – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) अंतर्गत रावेत येथे कार्यरत असलेल्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आयटी विभागाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी एकाच दिवसात तब्बल ७८ कॉपीराईट नोंदणी करून एक ऐतिहासिक कामगिरी केली.
बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights - IPR) या क्षेत्रात पीसीसीओईआरच्या आयटी विभागाने उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. या विक्रमी यशामागे संस्थेच्या दूरदृष्टीचे व नवकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांचे फलित आहे.
प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी बौद्धिक संपदेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, "आजच्या स्पर्धात्मक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात, कल्पनांचे संरक्षण हे अत्यंत गरजेचे झाले आहे. आयपीआर संस्थांना त्यांच्या संशोधन व उत्पादनांचे कायदेशीर संरक्षण पुरवते."
आयटी विभागप्रमुख डॉ. संतोषकुमार चोबे यांनी हा उपक्रम हाती घेतला असून, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांना कॉपीराईट नोंदणीसाठी प्रेरित केले. त्यांनी सांगितले की, "कॉपीराईट नोंदणीमुळे संशोधन, प्रकल्प व तांत्रिक कल्पनांची सुरक्षितता सुनिश्चित होते आणि ही बाब भविष्यातील नवउद्योजकतेला प्रोत्साहन देते."
या उपक्रमाचे समन्वयक प्रा. दिव्या पुनवंतवार यांनी सर्व टप्प्यांचे नियोजन व अंमलबजावणी केली.
या उल्लेखनीय यशामागे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे व अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
पीसीसीओईआरने याआधीही अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले असून, या विक्रमाने संस्था शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे.
...................................
#PCCOER
#CopyrightFiling
#AcademicExcellence
#IPRIndia
#EngineeringInnovation
#PuneColleges
#PCET
#StudentInnovation
#IntellectualProperty
#EducationNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: