तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे परिसरात भरदिवसा गोंधळ घालत दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली. किटक टोळी या नावाने ही टोळी परिसरात कुख्यात आहे.
या टोळीने तळेगाव दाभाडे येथे भर दिवसा मुलींची नावे घेऊन गल्लीमध्ये आरडाओरडा केला. एका महिलेला मारहाण करून विनयभंग केला. तिच्या दीराला कोयत्याचा धाक दाखवून खिशातील दीड हजार रुपये काढून घेतले. लोकांना धमकावून दहशत निर्माण केली. या प्रकरणी त्या महिलेने दि. 24 मे रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीवरून किटक उर्फ जय प्रवीण भालेराव (वय 19), वैभव राजाराम विटे (वय 25, दोघेही रा. तळेगाव दाभाडे), विशाल शिवाजी गुंजाळ (वय 20, रा. वराळे), प्रदीप वाघमारे (वय 20, रा. वडगाव), रुतिक मेटकरी (वय 20, रा. देहूरोड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह एका विधीसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासकामी आरोपींना घटनास्थळी नेले. आरोपींची धिंड काढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
किटक टोळीचा प्रमुख असलेला किटक भालेराव याच्या विरोधात तळेगाव
दाभाडे पोलीस ठाण्यात दरोडा, विनयभंग, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे,
मारहाण करून धमकी देणे व दहशत निर्माण करणे असे 10 गुन्हे दाखल आहेत.
आरोपी वैभव विटे याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सात
तर चाकण पोलीस ठाण्यात एक असे आठ विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी
विशाल गुंजाळ, प्रदीप वाघमारे आणि रुतिक मेटकरी यांच्यासह
विधीसंघर्षित बालकाच्या विरोधात देखील विविध गुन्हे दाखल आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: