नवीन संसद भवनाचे उद्घाटन देशातील जनतेसाठी सन्मानाची बाब : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

नवी दिल्ली  : नवीन संसद भवनाचे उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासिंयासाठी अभिमानाची तसेच सन्मानाची बाब असून, या अभूतपूर्व सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले असल्याची भावना, मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी व्यक्त केली.

देशाच्या राजधानीमध्ये नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्रीगण, दोन्ही सभागृहाचे खासदार, राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, उपमुख्यमंत्री, विविध मंत्रालयांचे सचिव, माजी केंद्रीय मंत्री, संसदेचे दोन्ही सभागृहांचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.

नवीन संसदेच्या निर्मितीबाबत बोलताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, आपले प्रखर देशाभिमानी असलेल्या मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले आहे, ही देशातील जनतेसाठी सन्मानाची बाब आहे. त्यांनी अतिशय ऐतिहासिक अशा वास्तूची संकल्पना मांडली आहे. आज या ऐतिहासिक वास्तूचे लोकार्पण झाले असून, संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा या नवीन वास्तूमध्ये लोकशाही अधिक बळकट होईल, वृद्धिंगत होईल असा विश्वास श्री.शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. आजचा दिवस हा 140 कोटी जनतेसाठी अभिमानाचा दिवस आहे. तसेच श्री.मोदींनी विक्रमी वेळेत संसदेचे ऐतिहासिक बांधकाम पूर्ण केले, असे म्हणत, त्यांनी पंतप्रधान मोदींचे यावेळी आभार मानले.

नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या  पहिल्या टप्प्यात सकाळी सर्व धर्म प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. श्री. शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी लोकशाही मंदिराचे वातावरण अतिशय भक्तीमय झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळच्या कार्यक्रमात श्री.मोदींनी सेंगोलला साष्टांग दंडवत घातला. नंतर या नव्या इमारतीच्या उभारणीमध्ये हातभार लावलेल्या कामगारांचा गौरव श्री. मोदी यांनी केला.

            नवीन संसदेच्या उदघाटन कार्यक्रमापूर्वी श्री. शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140 वी जयंती महाराष्ट्र सदनात साजरी झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र शासनातील मंत्री श्री.रावसाहेब दानवे-पाटील, श्री.कपिल पाटील उपस्थित होते. यावेळी खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, उन्मेश पाटील, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, धैर्यशील माने, धनंजय महाडिक, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, रणजित सिंह नाईक-निंबाळकर, भावना गवळी, कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव, राजेंद्र गावित उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर  सर्व मान्यवर संसदेच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम स्थळी रवाना झाले. 

नवीन संसद भवनाचे उद्घाटन देशातील जनतेसाठी सन्मानाची बाब : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवीन संसद भवनाचे  उद्घाटन देशातील जनतेसाठी सन्मानाची बाब :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Reviewed by ANN news network on ५/२९/२०२३ ०९:३२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".