पुणे : पुण्यातील कॉसमॉस बँकेचे अनेक वर्षे संचालक असलेल्या मुकुंद अभ्यंकर यांना बेदरकारपणे कार चालवून एका दुचाकीस्वार महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्द्ल दोषी ठरवत न्यायालयाने ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
पुण्यातील भांडारकर रोडवर असलेल्या अभ्युदय बँकेसमोर 17 जुलै 2016 रोजी बेदरकारपणे कारचालवत अरुंधती गिरीश हसबनीस (वय 30 रा. नर्हे) यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात अभ्यंकर यांच्या कारचे चाक हसबनीस यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर तेथे न थांबता अभ्यंकर घटनास्थळावरून पसार झाले होते. या प्रकरणी विक्रम सुशील धूत ( वय 35, रा. शिवाजीनगर ) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या खट्ल्याचे कामकाजचालून त्यात अभ्यंकर दोषी असल्याचे सिद्ध झाले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. दुगांवकर यांनी त्यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. या केसमध्ये अभ्यंकर यांच्यातर्फ़े ॲड. ऋषिकेश गानू यांनी काम पाहिले. तर, सरकारतर्फ़े रकारी वकील गिरीश बारगजे यांनी काम पाहिले. त्यांना फ़िर्यादीतर्फ़े ॲड. सूर्यकुमार निरगुडकर, ॲड. ऋग्वेद निरगुडकर आणि ॲड शशांक वकील यांनी मदत केली. सहायक पोलीस फौजदार खानेकर, हवालदार काकडे, भुवड, मोरे यांनी न्यायालयीन कामात मदत केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: