पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेस नेते नाना काटे यांनी वाढदिवसानिमित्त संत ज्ञानेश्वर मंदिराला दिली देणगी
नाना काटे यांच्या हस्ते संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम पाटील यांच्याकडे निधी सुपूर्द
पुणे (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या सहकाऱ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी येथे देणगी दिली आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर माउलींच्या मंदिरावर बसवण्यात येणाऱ्या २२ किलो वजनाच्या सुवर्णकलशासाठी ही देणगी जमा करण्यात आली आहे.
नाना काटे यांचे सहकारी मच्छिंद्र काटे, राहुल काटे, हर्षल काटे, सचिन झिंजुर्डे, प्रतीक काटे, श्रेयस काटे, संतोष काटे, उदय माझीरे, ओंकार काटे आणि भूषण काटे यांनी ही देणगी जमा केली. यावेळी नाना काटे यांच्या हस्ते संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. पुरुषोत्तमदादा पाटील यांच्याकडे देणगी सुपूर्द करण्यात आली. नाना काटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक महत्त्वाचा धार्मिक आणि सामाजिक उपक्रम म्हणून याकडे पाहिले जात आहे.
या प्रसंगी नाना काटे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना अभिषेक करून मनोभावे दर्शन घेतले. त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी यावेळी अनेक सहकारी आणि हितचिंतक उपस्थित होते. या देणगीमुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडणार असून, भाविकांसाठी ही एक आनंदाची बाब आहे.
Political News, Community Event, Donation, Alandi Temple
#NanaKate #PimpriChinchwad #NCP #AlandiTemple #Donation #GoldenKalash #CommunityService

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: