कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणा-यास उज्ज्वल भवितव्य : विनायक पाचलग

 

पीसीसीओई मध्ये 'अभियांत्रिक्स - २३' परिषद

पिंपरी :  विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांती झाली आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विविध क्षेत्रात होऊ लागला आहे. याचा विचार करता भविष्यामध्ये कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर नवीन संशोधनात खुबीने केला तर अशा संशोधनास उज्ज्वल भवितव्य आहे, असे मत वेबबिझ टेक्नॉलॉजीजचे सीईओ विनायक पाचलग यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ इंजिनीअरिंगने 'अभियांत्रिक्स -२३' ही अनोखी संकल्पना घेऊन विद्यार्थी परिषद आयोजित केली होती. परिषदेचे उद्दिष्ट उपस्थित विद्यार्थ्यांचे प्रायोगिक परिणाम, संशोधन कार्य, लेखांचे पुनरावलोकन करणे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि विद्याशाखांसोबत भविष्यातील संशोधन दिशानिर्देशांवर विचारांची देवाणघेवाण करणे असे होते.

सहभागी संघांनी त्यांच्या प्रमुखांसह परिषदेचे संयोजन केले. गुरुप्रसाद देशपांडे अध्यक्ष, पुष्कर महाजन सह अध्यक्ष, आणि वैष्णवी गाढवे सह अध्यक्ष यांनी नियोजन केले.

  विनायक पाचलग यांनी 'एआयच्या (आर्टिफिशियल इन्टिलिजन्स) जगात कोण टिकेल' या विषयावर नाविन्य आणि उद्योजकता याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

दोन दिवसांच्या या परिषदेत विद्यार्थ्यांनी उत्‍साहपूर्ण सहभाग नोंदवला ज्यांनी व्हीएलएसआय आणि एम्बेडेड सिस्‍टम, सिग्नल प्रोसेसिंग, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, एनर्जी आणि ऑटोमेशन, केस स्टडी आधारित सादरीकरण, उदयोन्मुख तंत्रज्ञान या सहा ट्रॅकवर आपले शोधनिबंध सादर केले. प्रत्येक ट्रॅकमधून सर्वोत्कृष्ट सादरीकरणास पारितोषिक देण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य आणि ज्ञान प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. व्होडाफोन इंटेलिजेंट सोल्युशन्सचे डेप्युटी जनरल मॅनेजर आणि डेटा विश्लेषक विशाल जैन यांच्या मार्गदर्शनाने परिषदेचा समारोप झाला. विशाल जैन यांनी विद्यार्थ्यांना 'डेटा ॲनालिटिक्सचे उद्योग वापर प्रकरणे' या विषयावर मार्गदर्शन केले. 'अभियांत्रिक्स - २३' हा एक उपयुक्त कार्यक्रम होता ज्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांचा शोध घेण्यास आणि प्रयोग करण्यास प्रोत्साहित केले. त्यांचे ज्ञानाचे क्षितिज विस्तारले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. एन. बी. चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. एम. टी. कोलते, डीन ॲकॅडेमिक्स डॉ. शीतल भंडारी यांच्यासह प्राध्यापक सल्लागार डॉ. डी. एस. खुर्गे, ए. ए. श्रीवास्तव, ए. एस. शिंदे आणि एस. एस. आयने यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणा-यास उज्ज्वल भवितव्य : विनायक पाचलग कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणा-यास उज्ज्वल भवितव्य  : विनायक पाचलग Reviewed by ANN news network on ५/३०/२०२३ ०९:४३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".