मराठवाडा : सोयगाव येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सोयगावचा छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाचा संघ विजेता तर हरियाणा संघ उपविजेता
दिलीप शिंदे
सोयगाव : जालना खासदार चषक अंतर्गत छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ सोयगाव व क्रीडा भारती यांच्या सयूंक्त विद्यमाने सोयगाव येथे दि.२७ व २८ ला पंचायत समिती सोयगाव मैदानावर प्रकाशझोतात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हरियाणा संघाविरुद्ध छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाच्या संघाने बाजी मारीत प्रथम क्रमांक पटकावला तर हरियाणा संघ उपविजेता ठरला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ६१ हजार रुपये व खासदार चषक छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ सोयगाव यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक३१ हजार रुपये व तापीराम मानकर चषक हरियाणा संघ व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक १५ हजार रुपये परभणी संघ या विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत चोवीस संघांनी सहभाग नोंदवला होता. कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू आनंदा इंगळे, आबा पवार, विकास चौधरी, ज्ञानेश्वर वाडेकर, संदीप सुरडकर, करीम देशमुख, गोविंदा सोनवणे, अलिखा पठाण, श्रीकांत बोरसे,भूषण पवार, दीपक बनकर, भरत पगारे, दिलीप पायघन, गणेश दुसाने, कैलास काळे, नाना वामने, अविनाश पाटील, रतन फूसे,एस टी चालक जुमनाके, अनिल रोकडे, महेश दुसाने,दत्तू काटोले,कमलेश काळे, शेख दिलीप, दत्तू पोटदुखे व समाधान काळे यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: