पिंपरी : महिला कुस्तीपटूंच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

 



पिंपरी : ब्रिज भूषणशरण सिंह यांना अटक झालीच पाहिजेखिलाडियों के सन्मान में राष्ट्रवादी मैदान मेपंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा द्याअशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर याच्या वतीने  दिल्लीमध्ये महिला कुस्तीपटूंना झालेल्या मारहाण व अटकेच्या निषेधार्थ आंदोलन घेण्यात आले. 


त्यामध्ये पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन मंगळवारी सकाळी घेण्यात आले. शहराध्यक्ष प्रा.कविता आल्हाट म्हणाल्या कीराष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात सात कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गुन्हे दाखल केले आहेत. परंतु दिल्ली पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यानंतर कुस्तीपटूंनी गेल्या २३ एप्रिल पासून जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केले होते. नव्या संसद भवनासमोर महिलांची खाप पंचायत करण्याची घोषणा कुस्तीपटूंनी केल्याने पोलिसांनी कुस्तीपटूंवर कारवाई केलीयात बजरंग पूनिया,विनेश फोगाट व साक्षी मलिक यांना पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले. 

    

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन संसद भवनाचे उद्घाटन करत असताना दुसरीकडे  भारतीय  महिला कुस्तीपटू आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन घेत होते परंतु यांना संसद भवनाचे उद्घाटन करण्यातच जास्त रस दिसत होता. हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे खेळाडू जेव्हा देशासाठी पदक जिंकतात तिरंगा अंगा खांद्यावर घेऊन भाऊक होतात ,आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान उंचावताततेव्हा  अभिमानाने उर भरून येतो. घडलेले दृश्य मान शर्मने झुकवणारे आणि अंतर्मुख होऊन पहायला लावणार आहे. लोकशाही कडून हुकूमशाही कडे  वाटचाल होते की काय असे वाटायला लागले खेळाडूंच्या आंदोलनानंतर व कालच्या या घटनेनंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ब्रिज भूषण सिंग यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा नाहीतर क्रीडा संघटनेच्या वतीने व शहराच्या वतीने अतिशय तीव्र आंदोलन यापुढे घेण्यात येईल इशारा देण्यात आला.


यावेळी महिला अध्यक्षा प्रा.सौ.कविता आल्हाटयुवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, महिला वरिष्ठ कार्याध्यक्षा कविता खराडेमहिला कार्याध्यक्ष सविता धुमाळलता ओव्हाळ, सामाजिक नेते देवेंद्र तायडेव्हीजेएनटी सेल अध्यक्ष राजू लोखंडे,  अर्बन सेल महीला अध्यक्ष मनीषा गटकळव्हीजेएनटी सेल महिला अध्यक्ष निर्मला मानेचिंचवड विधानसभा अध्यक्षा संगीता कोकणेभोसरी विधानसभा अध्यक्ष ज्योती तापकीरभोसरी विधानसभा उपाध्यक्ष पूनम वाघभोसरी विधानसभा कार्याध्यक्ष ज्योती गोफणेशहर संघटीका ज्योती निंबाळकर,  चिंचवड विधानसभा संघटीका मीरा कदमपिंपरी विधानसभा महिला कार्याध्यक्षा दिपाली देशमुखमहिला उपाध्यक्षा उषा उभारेविजया काटेउपाध्यक्ष आशा मराठेसारिका हरगुडेउपाध्यक्षा मेघा पळशीकरशहर उपाध्यक्षा शोभा साठेनीलम कदमसुप्रिया जाधव, अंकीता साबळेसपना कदमकिरण शेगोकर,  कामगार विभाग कार्याध्यक्ष युवराज पवार,  सरचिटणीस  राजन नायरउपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे,  शिरीष साठे, प्रदीप गायकवाड, संपत पाचुंदकर, बिरुदेव मोटे चिटणीस राजू चांदणेविकी साठेमाजी सैनिक सेल प्रदेश उपाध्यक्ष पोपट पडवळकोमल भालेकर,रिझवाना शेखआण्णा पाखरेसरचिटणीस राजेश हरगुडेरोहित जाधवसंदीप शिंदेयुवक उपाध्यक्ष ओम क्षीरसागर, ऋषिकेश शिंदेइत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी : महिला कुस्तीपटूंच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन पिंपरी : महिला कुस्तीपटूंच्या अटकेच्या निषेधार्थ  राष्ट्रवादीचे आंदोलन Reviewed by ANN news network on ५/३०/२०२३ ०२:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".