पिंपळे सौदागर, १ ऑगस्ट २०२५: आज पिंपळे सौदागर येथील पीके चौकात एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. चिंचवड येथील एक व्यक्ती ॲक्टिवा गाडीने पीके चौकातून कोकणे चौकाच्या दिशेने जात असताना एका आरएमसी (RMC) गाडीखाली आल्याने हा अपघात झाला.
नाना काटे यांची तातडीची मदत
या अपघाताची माहिती मिळताच माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने सांगवी पोलीस विभाग, सांगवी वाहतूक विभाग आणि रुग्णवाहिकेला (ॲम्ब्युलन्स) कळवून सर्व मदत घटनास्थळी पोहोचवली.
या घटनेनंतर नाना काटे यांनी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक आणि सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना या बेशिस्त आणि जड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Pimple Saudagar Accident, PK Chowk, Two-Wheeler Fatality, Nana Kate, Traffic Accident, Sangvi Police, RMC Vehicle, Pimpri Chinchwad, Road Safety
#PimpleSaudagar #Accident #NanaKate #TrafficSafety #RoadAccident #PimpriChinchwad #RoadSafetyFirst #PimpriChinchwadNews
पिंपळे सौदागर येथील पीके चौकात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Reviewed by ANN news network
on
८/०१/२०२५ ०४:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: