पिंपरी-चिंचवड, १ ऑगस्ट २०२५: लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त , पिंपरी-चिंचवड जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (RSS) त्यांना अभिवादन करण्यात आले.
सकाळी ८.३० वाजता , जिल्हा संघचालक विनोद बन्सल आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे यांच्या उपस्थितीत संघ कार्यकर्त्यांनी निगडी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर, निगडी पवळे उड्डाणपूल चौकातील लोकमान्य टिळकांच्या अर्धपुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शहरात
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित
विविध कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
अभिवादन कार्यक्रमात विनोद बन्सल, देहू
गट संघचालक
नरेश गुप्ता, हेमंत
हरहरे, समरसता विभागाचे विलास लांडगे, अनिल सौंदडे, नाना कांबळे, सोपान कुलकर्णी, सुहास देशपांडे यांच्यासह अनेक
स्वयंसेवक उपस्थित होते.
Annasaheb Sathe Jayanti, Lokmanya Tilak Punya Tithi, Pimpri
Chinchwad, RSS, Rashtriya Swayamsevak Sangh, Tribute, Vinod Bansal, Hemant
Harhare, Nigdi, Community Event.
#AnnabhauSathe #LokmanyaTilak #RSS #PimpriChinchwad #Tribute #Nigdi #Maharashtra #Jayanti #PunyaTithi.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: