पुणे, २९ जुलै २०२५: कारगिल विजय दिन (२६ जुलै), क्रांती दिन (९ ऑगस्ट) आणि स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) या राष्ट्रीय दिनांचे औचित्य साधून, पिंपरी-चिंचवडमधील राजे शिवाजीनगर (टाळगाव, चिखली) येथे शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत 'राष्ट्रभक्ती संस्करण महाकविसंमेलनाचे' आयोजन करण्यात आले आहे.
आयोजकांनी पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील सर्व
देशभक्त कवींना या 'राष्ट्रभक्ती संस्करण महाकविसंमेलनात' स्वयंस्फूर्तीने सहभागी
होण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमातून महाराष्ट्रात १०
तासांचे महाकविसंमेलन आयोजित करून साहित्य क्षेत्रातील विक्रम
करण्याचा मानस आहे. सर्व
देशभक्त कवी सकारात्मक प्रतिसाद देतील
अशी आशा संयोजकांनी व्यक्त
केली आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण: श्री. गणेश
चौक, डॉयगोनल मॉल,
सेक्टर नं. १६, राजे शिवाजीनगर, चिखली
प्राधिकरण, पुणे – ४१२०१९.
Poetry Event, Patriotism, Indian Army, Independence Day, Kargil Vijay Diwas, Kranti Din, Pune, Chikhali, Maharashtra, Cultural Event, Literature, Tribute to Soldiers.
#RashtrabhaktiMahakavisammelan #PuneEvents #IndependenceDay #KargilVijayDiwas #KrantiDin #IndianArmy #PatrioticPoetry #Chikhali #PimpriChinchwad #Maharashtra #TributeToSoldiers #PoetryFestival

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: