दिलीप शिंदे
सोयगाव : शेतकऱ्यांच्या पिकांना व कापसालाही भाव मिळत नसल्याने गिरीश महाजनांच्या होमपीचवर शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक होऊन दि.२९ सोमवारी जामनेर येथील नगरपालिका चौकात कापसाची तिरडी तयार करीत चार कार्यकर्त्यांनी खांदा देत तहसील कार्यालयापर्यंत कापसाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती.
कापसाला भाव मिळाला पाहिजे, पेरणीसाठी प्रति एकर पाच हजार रुपये अनुदान दयावे, शासनाने शेतकऱ्यांचा विमा काढावा, बाजार समितीत शेती मालाची हमी भावाने खरेदी करावी .अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले. तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेतर्फे (ठाकरे गट) देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेनेचे जळगाव उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण,जामनेर तालुकाप्रमुख नरेंद्र धुमाळ, भैया गुजर,मयूर पाटील,अतुल सोनवणे, सागर साठे, विशाल जंजाळ, सुरेश चव्हाण,योगेश गोसावी, शेख सईद,अनिल चौधरी,मनोज मिस्तरी आदींसह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: