दिल्ली: प्रथमच आगळावेगळा टीव्हीएफ पिचर्स सीझन २ चा प्रीमियर विमानात सादर करत ZEE5 च्या भागीदारीत एअर एशिया इंडियाने रचला इतिहास

 



दिल्ली : एअर एशिया इंडियाने टीव्हीएफ पिचर्स सीझन २ चा प्रीमियर चाहते आणि शोच्या कलाकारांच्या उपस्थितीत त्यांच्या इन-फ्लाइट एक्सपीरियंस हब ‘एअर फ्लीक्स’ वर हवेत ३६,००० फूट उंचीवर केला सादर.

एअर एशिया इंडिया फ्लायर्स आता हवेतील पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 सह उच्च ऑक्टेन मनोरंजनात सहभागी होऊ शकतात

 

राष्ट्रीय, २२ डिसेंबर २०२२: प्रथमच होणाऱ्या उपक्रमांच्या क्रमवारीत आणखी एक मैलाचा दगड पार करताना एअर एशिया इंडियाने टीव्हीएफ पिचर्स: सीझन २ चा विशेष प्रीमियर आयोजित केला. शुगरबॉक्स आणि ओटीटी भागीदार ZEE5 समार्थित नुकत्याच सादर केलेल्या इन-फ्लाइट एक्सपीरियंस हब ‘एअर फ्लीक्स’ वर हा विशेष प्रीमियर करण्यात आला. या प्रसंगीटीव्हीएफ पिचर्स (एस २) या कल्ट सिरीजचे दिग्दर्शक आणि कलाकार २२ डिसेंबर रोजी दिल्ली ते बेंगळुरू दरम्यान i5-784  वर इन-फ्लाइट प्रीमियरला उपस्थित होते. ZEE5 वरील वैभव बंधू दिग्दर्शित टीव्हीएफ पिचर्सच्या आगामी सीझनमध्ये नवीन कस्तुरियाअभय महाजन आणि अरुणभ कुमार हे कलाकार आहेत.



भारतातील सर्वात मोठ्या स्वदेशी ओटीटी प्लॅटफॉर्म 
ZEE5 सह ही धोरणात्मक भागीदारी एअर फ्लीक्स ला विमान प्रवासाचा अनुभव अधिक उच्च पातळीवर नेताना ६,००० तासांहून अधिक उच्च-रिझोल्यूशन आशय सादर करण्यास सक्षम करते१,००० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि भारतीय चित्रपटलघुपट आणि वेब सिरीजच्या १५०० हून अधिक भागांचा आशय उपलब्ध करून देते. या सहयोगाने ZEE5 ला ऑनबोर्ड प्रवाशांसाठी उपलब्ध असलेले पहिले ओटीटी प्लॅटफॉर्म बनवले आहेजेथे वापरकर्ते लॅग-फ्री आशय बघू शकतात. शुगरबॉक्सद्वारे समर्थितएअर फ्लीक्स सह फ्लायर्स खाद्यपदार्थ आणि पेयेतसेच बोटमॅन मॅटर्सअराटा आणि अशा अनेकविध क्युरेटेड ई-कॉमर्स ब्रँडसाठी फ्लाइटमध्ये शॉपिंग ऑर्डर देऊ शकतात.

 

"आमच्या नवीन इन-फ्लाइट एक्सपीरियंस हब ‘एअर फ्लीक्स’ वर टीव्हीएफ पिचर्स सीझन २ या कल्ट शोचा संपूर्ण सीझन दिग्दर्शक आणि कलाकारांसह नॅरोकास्टिंग करून आकाशात ३६,००० फूट उंचीवर अशा प्रकारचा पहिला भव्य प्रीमियर आयोजित करताना आम्ही रोमांचित आहोतहा अनोखा अनुभव सादर करण्यासाठी आमचे तंत्रज्ञान भागीदार शुगरबॉक्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 सह सहयोग करताना आम्हाला खूप आनंद झाला,” असे एअर एशिया इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी सिद्धार्थ बुटालिया म्हणाले. "आम्ही नेहमीच इन-फ्लाइट अनुभव वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग शोधत असतोसमविचारी भागीदारांसोबत यासारखे अनोखे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव हवाई प्रवासात आणणे खूप आनंददायी आहे."

 

नवीन उपक्रमावर भाष्य करताना, ZEE5 इंडियाचे मुख्य व्यवसाय अधिकारी श्री. मनीष कालरा म्हणाले, "विमान प्रवाशांचा विमान प्रवासाचा अनुभव उच्च सुधारित करण्यासाठी ओटीटी आशय फ्लायर्ससाठी उपलब्ध करून देण्याचा या उद्योग क्षेत्रातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आणताना ZEE5 ला आनंद होत आहे. ग्राहककेंद्री पहिला ब्रँड म्हणूनव्यावसायिक रणनीती तयार करताना ZEE5 ने नेहमीच प्रेक्षकांच्या मागण्या केंद्रस्थानी ठेवल्या आहेत. यामुळे आता विमान प्रवासी त्यांच्या इन-फ्लाइट एंटरटेनमेंट एक्सपोजरचा एक भाग म्हणून ZEE5 आशयाचा आनंद विमान प्रवासात घेऊ शकतात. मनोरंजनाच्या निवडींमध्ये अधिकाधिक वाव आणि ग्राहकांसाठीच्या सुधारित अनुभवांसाठी नावीन्यपूर्णतेच्या पलीकडे जाणे शक्य करत या धोरणात्मक सहकार्यासाठी आम्ही आमचे भागीदार एअर एशिया इंडिया आणि शुगरबॉक्स यांचे आभारी आहोत.  . आम्ही ZEE5 वर विविध टचपॉइंट्सवर नाविन्यपूर्णतेसाठी आणि व्यापक प्रेक्षकवर्गासाठी आशय उपलब्ध करून देण्यासाठी गुंतवणूक करत आमच्या ग्राहक-प्रथम धोरणाचा लाभ घेत राहू."


शुगरबॉक्सचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित परांजपे म्हणाले, “एअर फ्लीक्स हा अशा प्रकारचा जागतिक स्तरावरचा पहिलाच उपक्रम आहे जिथे आम्ही क्लाउडची शक्ती विमानांमध्ये आणत आहोतया तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही Zee5 हे पहिले ओटीटी  अॅप इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवाय इन-एअर फ्लायर्ससाठी सक्षम केले आहे आणि टीव्हीएफ पिचर्स सीझन २ च्या प्रीमियरसारखे अनोखे अनुभव उपलब्ध करून देत आहोत. हे अभिसरण एअर फ्लीक्स’ ला विमान प्रवासाचा अनुभव बदलून टाकत कॉनटेकश्यूअल, हायपरलोकल सेवांद्वारे आज टेक-टोटिंग प्रवाशांसाठी अनेक ऑफर देण्यास सक्षम करते."

 

क्लाउड-टेक समर्थित इन-फ्लाइट एक्सपीरियंस हब एअरफ्लिक्स, तिची पुरस्कारप्राप्त वेबसाइट आणि मोबाइल अॅपएआय-संचालित संभाषणात्मक चॅटबॉट टिया आणि फ्लाय पोर्टर बॅगेज डिलिव्हरी सेवा आणि अखंड सिंगल-साइन, टाटा NeuPass लॉयल्टी प्रोग्रामवर तयार केलेले प्रोफाइल व्यवस्थापन आणि वैयक्तिकरण यासारखी उत्पादने सक्षम करण्यासाठी नाविन्यपूर्ण सेवा पुरवठादारांसोबत एकीकरण यांसारख्या अग्रगण्य डिजिटल आणि मार्केटिंग उपक्रमांसह कामकाज उत्कृष्टता आणि वर्धित अतिथी अनुभवासाठी विमानकंपनी वचनबद्ध आहे.

दिल्ली: प्रथमच आगळावेगळा टीव्हीएफ पिचर्स सीझन २ चा प्रीमियर विमानात सादर करत ZEE5 च्या भागीदारीत एअर एशिया इंडियाने रचला इतिहास दिल्ली: प्रथमच आगळावेगळा टीव्हीएफ पिचर्स सीझन २ चा प्रीमियर विमानात सादर करत  ZEE5 च्या भागीदारीत एअर एशिया इंडियाने रचला इतिहास Reviewed by ANN news network on १२/२२/२०२२ ०८:०२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".