घरगुती उपकरणे, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर अनेक उत्पादनांवर मिळवा भारी डिस्काऊंट्स!
~ क्रोमाच्या ख्रिसमस आणि न्यू इयर सेल ऑफर्स २ जानेवारी २०२३ पर्यंत सुरु राहतील ~
~ गेमिंग लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स, घरगुती उपकरणे आणि इतर अनेक उत्पादनांवर मिळवा आकर्षक डील्स ~
~ लकी ड्रॉ बँड्स देखील उपलब्ध होतील, त्यांच्यासह तुम्ही स्टोरमध्ये मिळवू शकाल भारी डिस्काऊंट्स ~
~ सर्व क्रोमा स्टोर्समध्ये आणि croma.com वेबसाईटवर हे कॅम्पेन चालवले जात आहे. ~
पुणे : क्रोमाच्या फेस्टिवल ऑफ ड्रीम्स, न्यू इयर सेलमध्ये तुम्हाला मिळत आहे आनंदाने आणि उत्साहाने सरत्या वर्षाचा निरोप घेण्याची संधी. भारतातील पहिले आणि विश्वसनीय ओम्नीचॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आणि टाटा समूहातील एक सदस्य क्रोमाने उत्पादनांच्या सर्व श्रेणींमध्ये ग्राहकांच्या आवडीच्या गॅजेट्स व उपकरणांवर आकर्षक ऑफर्स सुरु केल्या आहेत. लॅपटॉप्स, मोबाईल फोन, घरगुती उपकरणे, टीव्ही आणि इतर अनेक उत्पादनांची खरेदी करण्याची आपली स्वप्ने पूर्ण करण्याची उत्तम संधी क्रोमामध्ये मिळत आहे. सुट्ट्यांच्या संपूर्ण सीझनमध्ये २ जानेवारी २०२३ पर्यंत क्रोमाच्या स्टोर्समध्ये आणि croma.com वर हा सेल सुरु राहील.
ख्रिसमस आणि नवे वर्ष या दोन्ही निमित्ताने भरपूर आनंद साजरा केला जातो. 'सीक्रेट सांता' खेळण्यापासून आपल्या प्रिय व्यक्तींसाठी आवडीच्या भेटवस्तू खरेदी करण्यापर्यंत - ग्राहकांच्या सर्व इच्छा, आकांक्षा, गरजा पूर्ण करण्यासाठी क्रोमाने सुरु केले आहेत भारी डिस्काऊंट्स. तसेच क्रोमाने तीन बँड्स देखील आणले आहेत - लकी ड्रॉ विजेत्यांना स्टोरमध्ये केलेल्या खरेदीवर रेड बँडवर १०% ची सूट, ग्रीनवर ५% आणि व्हाईटवर ३% ची सूट दिली जात आहे. लकी ड्रॉ बँड्स फक्त स्टोर्समध्ये २३ डिसेंबर ते २५ डिसेंबरपर्यंत आणि ३१ डिसेंबर ते १ जानेवारी २०२३ पर्यंत या दोन टप्प्यांमध्ये रीडीम करता येतील.
वर्षाचे शेवटचे दिवस आनंदाने साजरे करण्यासाठी क्रोमाने भरपूर ऑफर्स सादर केल्या आहेत. भेटवस्तू खरेदी करणे असो किंवा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीला स्मार्टफोन गिफ्ट करणे असो, क्रोमामध्ये ५जी स्मार्टफोन्सच्या किमती फक्त १२,९९९ रुपयांपासून सुरु होतात, इतकेच नाही तर, काही निवडक ब्रँड्सवर क्रोमा ४,९९९ रुपयांचे स्मार्टवॉच देखील मोफत देत आहे. गेमिंगचे शौकीन जर अपग्रेडबाबत विचार करत असतील, तर १२ जनरेशन इन्टेल (आर) गेमिंग लॅपटॉप्सच्या किमती फक्त ५४,९९० रुपयांपासून सुरु होतात आणि बजेट लॅपटॉप खरेदी करायचा असल्यास इन्टेल (आर) कोर (टीएम) आय३ची किंमत फक्त ३४,९९० रुपयांपासून पुढे आहे.
सीझन ऑफर्सचा लाभ घेऊन आपल्या घरांमध्ये नवा उत्साह आणि नवा आनंद घेऊन येण्यासाठी उत्सुक ग्राहकांसाठी क्रोमाने रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन, स्मार्टफोन, इयरफोन, टेलिव्हिजन, घरगुती उपकरणे आणि इतर अनेक उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. ४के युएचडी टीव्ही फक्त ९९० रुपयांच्या मासिक ईएमआयवर मिळत आहे, एलजी ओएलईडी टीव्हीसाठी मासिक ईएमआय फक्त २९९० रुपये आहे. फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनच्या किमती २०९९० रुपयांपासून आणि साईड-बाय-साईड १.५ टन ३ स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसीच्या किमती फक्त ३४९९० रुपयांपासून पुढे आहेत. घरासाठी खरेदीच्या आकर्षक संधी ग्राहकांची वाट पाहत आहेत.
नव्या वर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करण्यासाठी क्रोमा त्यांच्या वेबसाईटवरून खरेदी करण्यात आलेल्या एएमडी गेमिंग लॅपटॉप्सवर देत आहे ४०% पर्यंत डिस्काउंट आणि ५००० रुपयांपर्यंतचे कॅशबॅक. स्टोर्समध्ये निवडक एएमडी रिजन लॅपटॉप्सच्या खरेदीवर १४००० रुपयांपर्यंतच्या किमतीच्या मॉनिटरसारख्या फ्रीबीज आणि ऍक्सेसरीज मोफत दिल्या जात आहेत.
नाताळ आणि नववर्षाच्या पार्ट्या जोरदार असणार आहेत, त्यांच्या उत्साहाचे रंग खुलवण्यासाठी क्रोमाने पार्टी स्पीकर्सच्या किमती फक्त २,१९९ रुपयांपासून पुढे आणि साउंड बारवर ८०% पर्यंतची सूट देऊ केली आहे. सुट्ट्यांचा सीझन आणि वर्षाचे शेवटचे दिवस संस्मरणीय बनावेत यासाठी क्रोमाने सर्व जय्यत तयारी केली आहे.
एन्ड ऑफ द इयर सेलमधील डील्स आणि ऑफर्सची माहिती croma.com वर मिळेल किंवा आपल्या जवळच्या क्रोमा स्टोरवर जाऊन तुम्ही आकर्षक किमतींमध्ये आकर्षक डील्सचा लाभ घेऊ शकता.
*सर्व ऑफर्सवर अटी लागू आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: