पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाच्या निमित्ताने ४५ ठिकाणी विजयादशमी उत्सवाचे आयोजन
शहरातील तब्बल ४५ स्थानी होणार सामूहिक कार्यक्रम
२८ सप्टेंबर, २ व ५ ऑक्टोबरला भव्य पथसंचलनाचे आयोजन
पिंपरी :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून, पिंपरी चिंचवड शहरात यंदा तब्बल ४५ विविध स्थानी विजयादशमी उत्सवांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संघशक्तीचे आणि शिस्तीचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमांचे आयोजन २७, २८, ३० सप्टेंबर आणि २ व ५ ऑक्टोबर या दिवशी करण्यात आले आहे.
या उत्सवात हजारो स्वयंसेवक तसेच शिक्षण, समाजसेवा, माध्यमे, उद्योग, विज्ञान अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर पाहुणे सहभागी होणार आहेत. कार्यक्रमांदरम्यान देशभक्तीपर गीतगायन, घोष (बँड) पथकांचे सादरीकरण, पारंपरिक शस्त्रपूजन आणि अनुभवी वक्त्यांचे मार्गदर्शनपर संबोधन होईल.
संघाच्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक असलेले पथसंचलन २८ सप्टेंबर आणि २ ऑक्टोबर रोजी शहरातील मुख्य भागातून आयोजित करण्यात आले आहे.
शताब्दीनिमित्ताने 'पंचपरिवर्तन' संकल्पना
शताब्दी वर्षानिमित्त, स्वयंसेवकांनी समाजात पाच प्रमुख मूल्यांवर जनजागृती करण्याचा संकल्प केला आहे, ज्याला 'पंचपरिवर्तन' संकल्पना म्हटले जाते. यात पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्ये आणि 'स्व'बोध या पाच मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे. संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी शहरातील सर्व देशप्रेमी नागरिकांना या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील विजयादशमी उत्सवांचे वेळापत्रक
Labels: RSS Event, Vijyadashami Utsav, Pimpri Chinchwad, Centenary Celebrations, Community Gathering, Path Sanchalan
Search Description: RSS to hold grand Vijyadashami Utsavs across 45 locations in Pimpri Chinchwad, featuring parades, shastra poojan, and social awareness programs to mark the organization's centenary year.
Hashtags: #RSS #Vijyadashami #PimpriChinchwad #CentenaryCelebrations #PathSanchalan #MaharastraNews #SanghShakti #DasaraUtsav

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: