दौंड तालुक्यातील पांढरेवाडी व जिरेगाव MIDC मध्ये समाविष्ट करण्याबाबतचे पत्र बनावट; उपजिल्हाधिकाऱ्यांनी दाखल केली फिर्याद
बनावट सही व शिक्क्याच्या पत्रापासून नागरिकांनी सतर्क रहावे
पोलिसांकडून कायदेशीर कारवाई होणार
पुणे, दि. २६ (प्रतिनिधी): दौंड तालुक्यातील पांढरेवाडी आणि जिरेगाव ही गावे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) झोनमध्ये समाविष्ट करण्याबाबतचे एक बनावट पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित होत असून, नागरिकांनी अशा फसव्या पत्रांपासून सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भूसंपादन अधिकारी क्रमांक ३, पुणे यांच्या सही व शिक्क्याचा वापर करून हे खोटे पत्र तयार करण्यात आले आहे.
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ३), डॉ. संगीता राजापूरकर-चौगुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे निवेदन पूर्णपणे खोट्या व खोडसाळ असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या कार्यालयाकडून असे कोणतेही पत्र देण्यात आलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध शासकीय कामात हस्तक्षेप आणि सही व शिक्क्याचा गैरवापर केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अशा प्रकारे नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. राजापूरकर-चौगुले यांनी कळवले आहे.
Pune
Fake Letter
MIDC
Land Acquisition
Public Warning
: #Pune #FakeNews #MIDC #LandAcquisition #Maharashtra #PublicWarning

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: