२७ ते २९ ऑगस्टदरम्यान मुख्य मार्गांवर वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश
आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
पुणे, दि. २६ (प्रतिनिधी): मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान काढण्यात येणाऱ्या मोर्चामुळे पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पर्यायी मार्गांनी वाहतूक वळवण्याचे आदेश जारी केले आहेत.
हा मोर्चा २७ ऑगस्ट रोजी अहमदनगर येथून आळेफाटा, ओतूरमार्गे किल्ले शिवनेरी येथे पोहोचणार आहे. दुसऱ्या दिवशी २८ ऑगस्ट रोजी किल्ले शिवनेरी येथून नारायणगाव, मंचर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळामार्गे मुंबईकडे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर हे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.
असे असतील महत्त्वाचे वाहतूक बदल:
नगर-कल्याण मार्ग: नगरकडे जाणारी वाहतूक १४ नंबर जांभुत फाटा येथून बोर, बेल्हे, अळकुटी, पारनेरमार्गे अहमदनगरकडे जाईल.
नारायणगावकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक: नारायणगाव बायपासमार्गे कारफाटा, मंचर पोलीस स्टेशन, नागापूर, रोडेवाडी फाटा ते लोणी, पाबळमार्गे शिक्रापूर-नगर रोडवरून पुणे अशी वळवली जाईल.
खेडकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक: ही वाहने पाबळमार्गे जातील.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग: जुना पुणे-मुंबई महामार्ग क्र. ४८ वरील वाहतूक नवीन पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वळवण्यात आली आहे. चाकण-देहुरोडकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक वडगाव फाट्यावरून उर्से टोलनाकामार्गे जाईल.
लोणावळा शहर परिसर: लोणावळा शहरातून पुणे व मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गावरून न जाता वलवण पुलावरून थेट द्रुतगती मार्गाने जाईल.
हा आदेश २७ ऑगस्टच्या रात्री १० वाजल्यापासून २९ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहील.
PuneTraffic Diversions
Maratha Reservation
Protest March
Jitendra Dudi
#Pune #TrafficDiversion #MarathaMorcha #Maharashtra #TrafficUpdate

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: