प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय
पीओपी मूर्ती विघटनासाठी रसायन खरेदीसह अनेक प्रस्तावांना मंजुरीपिंपरी, दि. २६ ऑगस्ट २०२५, (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज मुख्य प्रशासकीय इमारतीतील सभागृहात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांना मान्यता देण्यात आली, तसेच शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला.
आजच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांना प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. यामध्ये पीएमपीएल संस्थेस विविध पासेसची रक्कम अदा करणे, प्रभाग क्रमांक १५ मधील पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करणे, तसेच दिघी येथील दत्तनगरमधील मंडपाचे सभामंडपात रूपांतर करणे अशा कामांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पीओपी गणेश मूर्तींच्या शास्त्रीय विघटनासाठी अमोनियम बायकार्बोनेट रसायनाची खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच, ह क्षेत्रीय कार्यालयातील स्वच्छतागृह देखभाल व साफसफाईसाठी लहान जेटिंग मशिन खरेदी करणे, विविध उद्यानांची देखभाल करणे आणि मनपा कर्मचाऱ्यांना ‘अवकारिका’ चित्रपट दाखवण्यासाठी आलेल्या खर्चास मान्यता देणे या विषयांनाही मंजुरी मिळाली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह संबंधित विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
PCMC
Standing Committee
Shekhar Singh
Pimpri
Pune
Urban Development
#PCMC #PimpriChinchwad #ShekharSingh #StandingCommittee #UrbanDevelopment #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: