पिंपरीतील सुवर्ण मित्र मंडळाचा सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव; प्रवीण तरडे यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन

 

समाजहित साधत ५० वर्षांची परंपरा कायम; वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन

ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांसाठी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आकर्षण

पिंपरी, पुणे, दि. २६ ऑगस्ट २०२५, (प्रतिनिधी): पिंपरी गावातील जुने आणि नामांकित सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठान यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या विशेष वर्षाच्या निमित्ताने आयोजित गणेशोत्सवातील देखाव्याचे उद्घाटन बुधवारी (दि. २७) रात्री ९ वाजता प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते होणार आहे.

मंडळाने आपल्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा कायम ठेवत यावर्षी गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी भजन, कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर तसेच युवती व महिलांसाठी मर्दानी खेळ, निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांचा समावेश आहे.

गेल्या पाच दशकांपासून समाजहिताचे अनेक उपक्रम राबवून या मंडळाने पिंपरी गावातील नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. यावर्षीचा गणेशोत्सव सर्व गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागाने आदर्शवत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सर्व स्पर्धा मोफत असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

या सर्व कार्यक्रमांमध्ये गणेशभक्त, मंडळाचे हितचिंतक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन सुवर्ण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



  • Ganeshotsav

  • Pimpri

  • Suvarna Mitra Mandal

  • Praveen Tarade

  • Golden Jubilee

#Ganeshotsav #Pimpri #SuvarnaMitraMandal #PraveenTarade #GoldenJubilee

पिंपरीतील सुवर्ण मित्र मंडळाचा सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव; प्रवीण तरडे यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन पिंपरीतील सुवर्ण मित्र मंडळाचा सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव; प्रवीण तरडे यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन Reviewed by ANN news network on ८/२६/२०२५ ०९:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".