राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते डॉ. यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी रुग्णालयाच्या वासंती मुसाळदे आणि अलिशिबा वाकडे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल 'सर्वोत्कृष्ट अवयव प्रत्यारोपण समन्वयक' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल बोलताना डॉ. पी. डी. पाटील, कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांनी सांगितले की, "हा पुरस्कार मिळाल्याने आमच्या अवयवदान आणि प्रत्यारोपण मोहिमेला अधिक बळ मिळाले आहे." तर डॉ. यशराज पाटील यांनी या यशाचे श्रेय संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमाला दिले. "भविष्यात यकृत, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुस यांसारख्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये अधिक प्रगती करून जास्तीत जास्त लोकांना जीवनदान देण्याचे ध्येय आहे," असेही ते म्हणाले.
आरोग्यमंत्री आबिटकर यांनी अवयवदान चळवळ गतिमान करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढे येण्याची गरज व्यक्त केली आणि सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.
Dr. D.Y. Patil Hospital, Organ Donation, Transplant, ROTTO-SOTTO, Awards, Pune.
#DYPatilHospital #OrganDonation #Transplant #ROTTO_SOTTO #Pune #Healthcare #Awards

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: