पुणे, (प्रतिनिधी): 'बहिणींच्या प्रेमाची उतराई होऊ शकत नाही', असे सांगत अंगणवाडी सेविकांनी मला राखी बांधून मायेच्या धाग्यात बांधले आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया नामदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली. क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम माझ्यासाठी भावनिक क्षण असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
क्रिएटिव्ह फाऊंडेशनतर्फे अंगणवाडी सेविकांसोबत मुरलीधर मोहोळ यांच्या घरी जाऊन रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर यांच्यासह विविध अंगणवाड्यांमधील सेविका उपस्थित होत्या.
संदीप खर्डेकर यांनी सांगितले की, या भगिनींनी ओवाळणी म्हणून अंगणवाडीतील बालकांसाठी उपयुक्त साहित्य देण्याची विनंती केली होती. त्यानुसार नऊ अंगणवाड्यांसाठी वजनकाटा आणि उंची मोजण्याचे उपकरण भेट देण्यात आले. भविष्यातही त्यांच्या मागणीनुसार आवश्यक साहित्य पुरविण्यात येईल, असे मंजुश्री खर्डेकर यांनी जाहीर केले.
अंगणवाडी सेविकांनी मुरलीधर मोहोळ यांनी व्यस्त दिनक्रमातून वेळ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 'मोहोळ अण्णांनी आम्हाला राखी बांधण्याचा मान दिला, हा आमच्यासाठी खूप भाग्याचा प्रसंग आहे', असे सुरेखा होले आणि विद्या भरेकर यांनी सांगितले.
Murlidhar Mohol
Creative Foundation
Raksha Bandhan
Anganwadi Workers
Pune Event
#MurlidharMohol #CreativeFoundation #RakshaBandhan #PuneNews #Anganwadi #SocialEvent

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: