पिंपरीमध्ये महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यव्यापी मेळावा;प्रलंबित मागण्यांसाठी २४ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरणार
पिंपरी: राज्यातील महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका, कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशन'च्या वतीने रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी पिंपरी येथे राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला होता. [या मेळाव्यात राज्यातील अनेक महानगरपालिकांचे कामगार नेते उपस्थित होते
हा मेळावा पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता पार पडला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते
या बैठकीत बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, सोलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, अमरावती, नांदेड-वाघाळा, कोल्हापूर, पनवेल, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, लातूर, धुळे, अहिल्यानगर, परभणी, इचलकरंजी आदी महानगरपालिकांमधील कामगार नेते उपस्थित होते
मेळाव्यात प्रामुख्याने कर्मचाऱ्यांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न चर्चिले गेले.]यामध्ये तीन ते चार महिन्यांपासून मासिक वेतन न मिळणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, वाढते कंत्राटीकरण थांबवून कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करणे, रुग्णालयांमध्ये रुग्ण व कर्मचाऱ्यांचे योग्य प्रमाण निश्चित करणे आणि सर्व कर्मचाऱ्यांना चांगली वैद्यकीय सेवा लागू करणे यांसारख्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली
या सर्व मागण्यांसाठी २४ ऑगस्ट २०२५ रोजी थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे पुन्हा एक राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे
Municipal Workers, Labor Union, Pimpri, Protest, Maharashtra
#Maharashtra #MunicipalWorkers #Pimpri #LaborUnion #Protest #OldPensionScheme #WorkersRights

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: