भक्ती-शक्ती चौक ते चाकण मार्गाच्या मेट्रोसाठी डीपीआरसाठीे केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांना निवेदन
पिंपरी, दि. ९ ऑगस्ट २०२५: पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची समस्या लक्षात घेता, निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते चाकणपर्यंत मेट्रो रेल्वे प्रकल्प राबवण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने तयार करून नवीन निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
खासदार बारणे यांनी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांची दिल्लीत भेट घेतली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही देशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहरी क्षेत्रांपैकी आहेत. त्यामुळे येथे मेट्रोचे जाळे वाढवणे काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले. सध्या केंद्र सरकारने निगडी ते भक्ती-शक्ती चौक मेट्रो विस्ताराला मान्यता दिली असून, त्याचे काम सुरू आहे.
याच मार्गाचा विस्तार करून भक्ती-शक्ती चौक ते किवळे, मुकाई चौक, वाकड (हिंजवडी मेट्रो स्टेशन), पिंपळे सौदागरमार्गे चाकणपर्यंत मेट्रो नेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. हा मार्ग औद्योगिक, शैक्षणिक आणि निवासी दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असून, मेट्रोचा विस्तार परिसराच्या सर्वांगीण विकासात उपयुक्त ठरेल, असेही बारणे यांनी सांगितले. या मार्गासाठी डीपीआर तयार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Pimpri Chinchwad, Metro Project, Srirang Barne, Chakan, Bhakti Shakti Chowk, DPR, Urban Development Minister.
#PimpriChinchwad #MetroProject #SrirangBarne #Chakan #UrbanDevelopment #PuneMetro #TrafficSolution

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: