७६६ ग्रॅम एमडी जप्त टोळी प्रमुखासह तीन आरोपींवर गुन्हा दाखल
मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरुद्धच्या संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सुधारित महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (M.C.O.C.Act) अंतर्गत महाराष्ट्रातील पहिली कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांनी ही कारवाई करत ७६६ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे.
१० जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र विधानसभेने या सुधारित कायद्याला मंजुरी दिली असून, ३० जुलै २०२५ पासून तो लागू झाला आहे. या कायद्यामुळे अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सक्रिय असलेल्या संघटित गुन्हेगारांचे जाळे नष्ट करण्यास मदत होणार आहे. ७ ऑगस्ट २०२५ रोजी दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान, पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीतील मुख्य आरोपी, जो स्वतः एकटाच आणि त्याचे इतर दोन साथीदार मिळून संघटित टोळी चालवत असल्याचे निष्पन्न झाले. या तीन आरोपींविरुद्ध मोकाअंतर्गत कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) लावण्यात आले आहेत.
Mumbai Police
MCOCA
Drug Bust
Crime
Law Enforcement
#MumbaiPolice #MCOCA #DrugBust #Crime #Mumbai #LawEnforcement

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: