सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ५२ हजार दुकानदारांमध्ये समाधानाचे वातावरण
इ-पॉस मशिनद्वारे धान्य वितरणासाठी प्रति क्विंटल २० रुपयांची वाढ
पिंपरी-चिंचवड, (प्रतिनिधी): राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिन रकमेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे दुकानदारांना अपेक्षित अशी वाढ मिळाली नसली तरी, राज्यातील ५२ हजार दुकानदारांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण आहे, असे ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉप किपर्स फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता यांनी म्हटले आहे. त्यांनी या निर्णयाबद्दल महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विजय गुप्ता यांनी म्हटले आहे की, "अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ई-पॉस मशिनद्वारे अन्नधान्य वितरणासाठी मिळणाऱ्या प्रति क्विंटल १५० रुपयांच्या मार्जिन दरात २० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दुकानदारांना आता प्रति क्विंटल १७० रुपये मार्जिन मिळणार आहे. ही वाढ अल्पशी असली तरी, २०१७ पासून अत्यल्प कमिशन मिळत असल्याने या निर्णयामुळे दुकानदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे."
विजय गुप्ता म्हणाले की, "दुकानदारांची साडेतीनशे रुपये कमीशन वाढीची मागणी जुनी आहे, परंतु सरकारने केवळ २० रुपयांची वाढ केली आहे. तरीही, सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडत असल्याची बाब लक्षात घेऊन आम्ही ही वाढ स्वीकारत आहोत. पण, कमीशन वाढीसाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे. लवकरच भरीव वाढीसह आमच्या उर्वरित मागण्याही मंजूर होतील, असा आम्हाला आशावाद आहे."
Fair Price Shops
Margin Hike
Vijay Gupta
Maharashtra Government
Ration Shopkeepers
#FairPriceShops #RationShop #MaharashtraGovernment #VijayGupta #PublicDistributionSystem #Mahayuti

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: