गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बाल गंधर्व रंग मंदिर येथे संयुक्त बैठक
मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
पुणे, (प्रतिनिधी): यंदाचा गणेशोत्सव शांततेत, निर्विघ्नपणे आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासन, पोलीस विभाग आणि सर्व गणेश मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात शहरातील सर्व गणपती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बाल गंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, शासनाने यंदा गणेशोत्सवास 'राज्यउत्सव' म्हणून दर्जा दिला आहे. त्यामुळे आपल्या शहरातील हा उत्सव निर्भयमुक्त वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यांनी मंडळांना कोणताही वादग्रस्त देखावा न करण्याची तसेच पावसाळ्यामुळे विजेची कामे करताना काळजी घेण्याची सूचना केली. सुरक्षिततेसाठी मंडळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, राज्योत्सवाच्या दर्जाच्या अनुषंगाने शासनामार्फत विविध उपक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत, ज्यात सर्व मंडळांनी सहभाग घ्यावा. महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सोयीसुविधांची माहिती दिली आणि गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक सुविधा दिल्या जातील, असे सांगितले.
Ganesh Festival
Pune Police
Amitesh Kumar
Pune District Collector
Ganeshotsav
#Ganeshotsav #Pune #Police #GaneshFestival #Maharashtra #AmiteshKumar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: