जव्हार येथे जनता दरबाराचे आयोजन; १५० हून अधिक निवेदने प्राप्त
विकासकामातील अनियमिततेच्या तक्रारींची चौकशी करण्याचे निर्देश
नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन
पालघर, (प्रतिनिधी): कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समतेच्या मार्गाने सोडवणे हीच खरी लोकसेवा आहे, असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. जव्हार येथे आयोजित जनता दरबारात ते बोलत होते.
या जनता दरबाराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आणि आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये रस्ते, वीजपुरवठा, पाणी, शिक्षण व्यवस्था, आरोग्य सेवा, तसेच जमीन अधिग्रहण व मोबदला यांसारख्या प्रश्नांचा समावेश होता. या वेळी सुमारे १५० निवेदने प्राप्त झाली.
मागील काही वर्षांत विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यांची न्याय भावनेने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले. तसेच, जिल्ह्याच्या सर्व विभागांना विकासकामांसाठी योग्य निधी वाटप करून कामे तातडीने राबवली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Ganesh Naik
Palghar
Janta Darbar
Public Service
Jawhar
#GaneshNaik #Palghar #JantaDarbar #Maharashtra #PublicService

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: