१५ ऑगस्टच्या ध्वजारोहण यादीतून नाव वगळल्याने गोगावले दिल्लीला
गोगावले यांच्यासोबत शिंदे गटाचे अन्य दोन आमदारही दिल्लीत दाखलअलिबाग, (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्याला शासकीय ध्वजारोहणाचा मान यंदा महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना मिळणार आहे. १५ ऑगस्ट रोजी अलिबाग येथे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सध्या रिक्त असल्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या यादीत आपले नाव नसल्याने मंत्री भरत गोगावले नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वेळीही ध्वजारोहणावरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी गोगावले यांचा ध्वजारोहण आपल्याच हस्ते व्हावे असा आग्रह होता. यादी जाहीर झाल्यानंतर नाराज झालेले गोगावले आज मुंबईतील कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहून दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत रायगडमधील शिंदे गटाचे अन्य दोन आमदारही असल्याचे समजते.
Aditi Tatkare
Bharat Gogawale
Raigad Flag Hoisting
Political Dispute
Independence Day
#AditiTatkare #BharatGogawale #Raigad #FlagHoisting #IndependenceDay #MaharashtraPolitics #ShindeGat

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: