शनिवारवाडा येथे महाराष्ट्रगीताचे सामूहिक गायन आणि सैनिकी शाळेचे संचलन
रमणबाग ते शनिवारवाडा काढण्यात आली शोभायात्रा
पुणे, (प्रतिनिधी): रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२५ व्या जयंतीनिमित्त 'इतिहास प्रेमी मंडळ' आणि 'बाजीराव पेशवे प्रतिष्ठान' यांच्या वतीने आज शहरात शोभायात्रेचे आयोजन करून त्यांना मानवंदना देण्यात आली. या शोभायात्रेत विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या शोभायात्रेची सुरुवात रमणबाग येथून झाली आणि तिचा समारोप शनिवारवाडा येथे करण्यात आला. शनिवारवाडा येथे सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले, तर नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून पेशव्यांना मानवंदना दिली.
यावेळी 'इतिहास प्रेमी मंडळा'चे अध्यक्ष मोहन शेटे यांनी बाजीराव पेशवे यांच्या जीवनकार्यावर कथाकथन केले. या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक शाम भुर्के, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे आणि डी.ई. सोसायटीचे डॉ. शरद आगरखेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. या शोभायात्रेत न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशाला, नु.म.वि., रेणुकास्वरूप, ज्ञानप्रबोधिनी (पुणे व निगडी), आर.सी.एम. गुजराती हायस्कूल, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा यांसारख्या अनेक शाळांनी सहभाग घेतला होता.
Bajirao Peshwa
Shobhayatra
Pune
Historic Event
Anniversary
#BajiraoPeshwa #Pune #Shaniwarwada #History #Maharashtra #Shobhayatra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: