राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रय पाष्टे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांची प्रमुख उपस्थिती
पिंपरी, दि. ९ ऑगस्ट २०२५: कोकण खेड तालुका अठरागाव रहिवासी विकास संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून संस्थेतर्फे रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्नेहमेळाव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू, लहान मुलांचे आणि महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच दहावी, बारावी आणि इतर परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ होणार आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि डायमंड पब्लिकेशनचे चेअरमन दत्तात्रय पाष्टे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, प्रमोद ताम्हणकर, निर्मला कदम आणि विजया सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी कोकण खेड तालुका अठरागाव विभागातील सर्व रहिवाशांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Konkan Khed Taluka Atharagaon, Residents' Association, Snehamelava, Pimpri, Silver Jubilee.
#Konkan #Pimpri #Snehamelava #SilverJubilee #CommunityEvent

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: