दोन मृतदेह सापडले, बेपत्ता लोकांचा शोध सुरू
उत्तरकाशी, दि. ६ ऑगस्ट २०२५: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील धराली येथे ढगफुटीनंतर उद्भवलेल्या आपत्तीमध्ये बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत १२० हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, दोन मृतदेहही सापडले आहेत. मात्र, अद्याप अनेक लोक बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू आहे.
राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने चंदीगड, सरसावा आणि आग्रा येथून दोन चिनूक आणि दोन एमआय-१७ हेलीकॉप्टर्स उपलब्ध करून दिले आहेत. या हेलीकॉप्टर्सच्या मदतीने रस्ते वाहतूक पूर्ववत करण्यासाठी आवश्यक असलेली जड यंत्रसामग्री घटनास्थळी पोहोचवली जात आहे.
बचावकार्यात भारतीय सेना, आयटीबीपी आणि बीआरओचे अधिकारी व जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आपदा सचिव विनोद कुमार सुमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागांमध्ये आपत्ती येण्याची शक्यता आहे, तेथून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे आणि त्यांच्या राहण्याची व खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Uttarakhand, Uttarkashi, Disaster, Cloudburst, Rescue Operation, Army, NDRF, SDRF.
#Uttarkashi #Uttarakhand #Cloudburst #RescueOperation #Disaster #IndianArmy #NDRF #SDRF

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: