पुणे आणि साताऱ्यात वृक्षारोपण आणि शालेय साहित्य वाटप
बी.जे. मेडिकल कॉलेज आणि गुळूंब हायस्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन
पुणे, (प्रतिनिधी): स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नवभारत मानवतावादी संस्था आणि शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मानवतावादी उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमात 'मानवतेचा सुगंध' या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत पुणे येथील बी.जे. मेडिकल कॉलेज आणि साताऱ्यातील गुळूंब हायस्कूल, गुळूंब, वाई येथे वृक्षारोपण आणि रोपवाटप करण्यात आले. तसेच गरीब आणि होतकरू मुलांना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले. संस्थेच्या २२ वर्षांच्या अखंड सेवेच्या निमित्ताने 'मानवतेचा सुगंध' या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रकाशन कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, उप-अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, वैद्यकीय अधीक्षक यलाप्पा जाधव, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भिलारे आणि सचिव प्रसाद यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पेरू, तुळस, गुलछडी, ओवा अशा विविध ५०० रोपांचे वृक्षारोपण व रोपवाटप करण्यात आले.
Navbharat Manavatavadi Sanstha
Independence Day
Special Publication
Tree Plantation
Social Initiatives
#NavbharatManavatavadiSanstha #IndependenceDay #Pune #SocialWork #Publication #TreePlantation

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: