रत्नागिरी, (प्रतिनिधी): नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून प्रथेप्रमाणे आज संध्याकाळी समुद्राला मानाचा नारळ अर्पण करण्यात आला. मच्छिमार समाजाच्या समृद्धीसाठी आणि त्यांचे समुद्रातील संकटांपासून रक्षण व्हावे यासाठी ही प्रार्थना करण्यात आली.
वाजतगाजत निघालेल्या मिरवणुकीने हा नारळ रत्नागिरी शहराच्या मांडवी किनाऱ्यावर आणण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते हा नारळ समुद्राला अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, राखीव पोलिस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे, पोलीस उपनिरीक्षक सागर वाळुंजकर यांच्यासह पोलीस दलातील अन्य अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ratnagiri Police
Narali Pournima
Coastal Rituals
Mandvi Beach
Fishermen
#Ratnagiri #NaraliPournima #RatnagiriPolice #MandviBeach #CoastalTraditions #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: